मुंबई : देशभरात 25 डिसेंबर ख्रिसमसची खास धूम पाहायला मिळाली. दरवर्षीप्रमाणे बॉलिवूडमध्ये देखील हा उत्सव अगदी उत्साहाने साजरा करण्यात आला. कलाकारांनी देखील हा दिवस अगदी उत्साहात साजरा केला. या ख्रिसमस पार्टीचा सलमान खान, शाहरूख खान ते अगदी सैफ - करीना, मलायका अरोरा यांनी देखील आनंद घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी सलमानच्या घरी खास ख्रिसमस सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. दबंग खानचं हे सेलिब्रेशन कोण टाळणार? घरची मंडळी, मित्र परिवार सगळेच या पार्टीला उपस्थित राहिले होते. 


सलमान खानने एक व्हिडिओ शेअर केला यामध्ये तिन्ही भाऊ डान्स फ्लोअरवर मस्त ठेका धरून नाचताना दिसत आहेत. या तिघांच्या डान्स स्टेप्स अतिशय भन्नाट आहेत. 



या व्हिडिओत सोहेल खान कुणाला तरी हातवारे करून डान्स फ्लोअरवर बोलवत असल्याचं दिसत आहे. तुम्हाला वाटेल की, तो आपल्या पत्नीला बोलवत आहे, तर नाही 



सोहेल खानने आयुष शर्माला डान्स फ्लोअरवर बोलवलं आहे. त्यामुळे या सगळ्यांनी मस्त धम्माल केली आहे. सलमानचा हा व्हिडिओ बघून चाहते देखील अतिशय खुष झाले आहेत. 


सलमानच्या या पार्टीत अनेक स्टार किड्सने देखील हजेरी लावली. करण जोहरचे जुळे यश आणि रुही, अर्पिता खानचा मुलगा अहिर, शाहरूख खानचा अबराम आणि तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य देखील या पार्टीला आला होता. 


तसेच करिनाने आपल्या पालकांसोबत ही पार्टी अटेंड केली. डिया मिर्झा,डेसी शाह यासारखे सलमान खानचे अगदी जवळचे मित्र या ख्रिसमस पार्टीला हजर होते.