मुंबई : ज्यांना मराठी चित्रपटसृष्टीत मामा म्हणून ओळखलं जातं त्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा 'शेंटिमेंटल'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकरी मग ती खाजगी असो, सरकारी असो, निमसरकारी असो प्रत्येक ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखणं, 'वर्क लोड' पायी घरच्यांकडे दुर्लक्ष करणं, 'डेड लाईनचा' स्ट्रेस हे सगळं आलंच! पण जे काम करतोय त्यात पॅशन, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायची वृत्ती असेल तर मग येणारा प्रत्येक दिवस 'शेंटिमेंटल' वाटायला लागतो.


असे पॅशनेट, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारे शेंटिमेंटल पोलीस अनुभवायचे असतील तर मग नुकताच प्रदर्शित झालेला 'शेंटिमेंटल' या चित्रपटाचा ट्रेलर चुकवून चालणार नाही. हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.