मुंबई : माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा चर्चेत आलीय. सध्या 'सुष' मॉडल रोहमन शॉल याला डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यातच सुष्मितानं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही व्हिडिओ आणि फोटो केल्यानंतर या चर्चांणा आणखीन बळ मिळालंय. या फोटोंमध्ये सुष्मिता आपल्या मित्रांसोबत आणि रोहमनसोबत ताजमहलची सैर करताना दिसतेय... तर सुष्मितानं रोहमन आणि आपली मुलगी रेने यांचा आणखीन एक व्हिडिओ शेअर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मितानं शेअर केलेल्या एका व्हिडिओत सुष्मिताची मोठी दत्तक मुलगी रेने आपल्या संगीत गुरुंकडून गाणं शिकताना दिसतेय. या व्हिडिओत रोहमनही रेनेसोबत गाणं गाताना दिसतोय. हे दोघे 'मोह मोह के धागे' गाताना दिसत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सुष्मिताच्या मुली अलीशाह आणि रेने दोघीही रोहमनसोबत मोकळेपणानं वावरताना दिसतात. 



सुष्मितानं वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी पहिली मुलगी रेने हिला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर तिनं दुसरी मुलगी अलिशा हिलाही दत्तक घेतलं... सुष्मिता सोशल मीडियावर आपल्या मुलींसोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. 



माजी युनिव्हर्स असलेल्या सुष्मिताचं नाव आत्तापर्यंत रणदीप हुडा, विक्रम भट्ट यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं... परंतु, अद्यापही सुष्मितानं अविवाहीत राहणंच पसंत केलंय.