Alia Bhatt Mistakenly Called Aishwarya: 'मेट गाला' हा सोहळा सोमवारी न्यूयॉर्क येथे पार पाडला. या सोहळ्याला नामवंत लोकांनी हजेरी लावली होती. यावेळी आलिया भट्टनंही विशेष उपस्थिती दर्शवली होती. आलियानं पहिल्यांदाच 'मेट गाला'मध्ये उपस्थिती लावली होती. त्यामुळे हा तिचा पहिला वहिला अनुभव होता. त्यामुळे तिच्यासाठी हा सोहळा फारच खास होता. सोमवारी न्यूयॉर्क (Met Gala 2023) येथे संपन्न झालेल्या मेट गाला आलेल्या आलियावर सगळ्यांच्याच नजरा फिरल्या होत्या. आई झाल्यानंतर आलिया आता सार्वजनिक ठिकाणी आत्मविश्वानं वावरते आहे. आलियाचा हा 'मेट गाला'चा पहिलाच अनुभव असला तरी यावेळी मात्र आलियाला ओळखण्यात 'मेट गाला'च्या पापाराझींनी मोठी चूक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मेट गाला'ला कायमच ऐश्वर्या राय हजेरी लावते परंतु यावेळी ती या सोहळ्याला उपस्थित नव्हती. आलियानं यावेळी उपस्थिती दर्शवली होती तसेच प्रियंका चोप्राही या सोहळ्याला उपस्थित होती. परंतु आलियानं रेड कार्पेटवर एन्ट्री घेताच तिला पापराझी ओळखू शकले नाहीत. तिला आलिया ऐवजी ऐश्वर्या म्हणून हाक मारल्यामुळे नेटकऱ्यांनी यावर तूफान विनोद केला आहे. यावेळी आलियानं अगदी ग्लॅमरस लुक कॅरी केला होता. फॅशन डिझायरन प्रबल गुरूंगच्या कलेक्शनमधील हा ड्रेस होता. या ड्रेसवर चक्क 1 लाख मोती लावले गेले (Alia Bhatt Met Gala Look) होते. त्यामुळे सोशल मीडियावर आलियाची प्रचंड क्रेझ होती. (video viral alia bhatt mistakenly called aishwarya at met gala alia smiles back)



आलिया आपला हा सुंदर असा ड्रेस घालून रेड कार्पेटवर एन्ट्री करते (Alia Bhatt Red Carpet Met Gala) तोच पापाराझी तिचे फोटो काढण्यासाठी आतूर होतात परंतु तेवढ्यात आलियाचा चेहरा टिपण्यासाठी तिला आपल्या कॅमेऱ्याकडे पाहायला सांगताना आलियाला चुकून ऐश्वर्या अशी हाक काही पापाराझी मारायला सुरूवात करतात परंतु त्यातूनही आलिया मात्र शांतपणे हसतमुखानं पापराझींना पोझ देते. यावेळी ती रेड कार्पेटवर तिचा फॅशन डिझायनर प्रबल गुरंगसोबत येते. 


हेही वाचा - VIDEO: लय Attitude! शाहरूख खाननं रागाच्या भरात फॅनला दिला धक्का, ट्रोलर्सच्या निशाण्यावर


पापराझींकडून अशी चूक ही अनेकदा होताना पाहायला मिळते. त्यामुळे पापराझींना (Paparazzi calls Aishwarya to Alia Bhatt) कायमच सगळेच ट्रोल करतात. यापुर्वीही नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्धाटनाला टॉम होलंड, गिगी हदीद आले असताना त्यांची नावं घेण्यातही पापाराझींकडून चुका झाल्या होत्या. मध्यंतरी ऐश्वर्यालाही चुकून कतरिना म्हणण्याची चूक पापाराझींकडून झाली होती. यावर काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा तर ऐश्वर्याचा अपमान आहे असं नेटकरी म्हणू लागले आहेत. यावेळी आलियानं आपले हे फोटोज सोशल मीडिवावरही शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना तूफान कमेंट्स आणि लाईक्स आले आहेत.