मुंबई : साधारण दीड वर्षाहून अधिक काळापासून संपूर्ण जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये घरातून बाहेर निघत सुट्टीवर जाण्याची अनेकांची इच्छाही झाली. पण, नियमांनी सर्वांच्याच पायाट बेड्या घातल्या होत्या. आता मात्र अनेक राष्ट्रांमध्ये लसीकरणानं वेग धरल्यानंतर कोरोना नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. प्रवासातही अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिणामी अनेकांचीच पावलं पर्यटन स्थळांकडे वळू लागली आहेत. सेलिब्रिटीही सध्या अशाच मूडमध्ये दिसत आहेत. अभिनेत्री सना खान हिनंही नुकतंच काहीसा निवांत वेळ काढत मालदिव बेटांना भेट दिली. पती अनससोबत ती इथं पोहोचली होती. 


सोशल मीडियावर तिनं या क्षणांचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. यामध्ये तिच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण, एका वळणावर तिच्या पतीनं चक्क तिला धक्के मारले आहेत.






अर्थात हे सारंकाही मजेत सुरु होतं. समुद्रकिनाऱ्यालगत टांगलेल्या एका झोपाळ्यावर सना झोका घेत होती. तिला झोका घेणं म्हणजे अगदी चित्रपटांमध्ये वगैरे दाखवतात तसं काहीसं होईल अशी अपेक्षा होती. पण, तसं काहीच झालं नाही आणि याला कारण होता तिचा पती अनस. 


अनसनं सनाला इतक्या जोरात धक्के दिले की तो झोपाळाच दिशाहीन होऊन फिरु लागला आणि रंगाचा बेरंग झाला. 'Expectations Vs reality' अशा स्वरुपाचा एक व्हिडीओ तिनं शेअर करत त्यावेळी नेमकं काय झालं होतं हे फॉलोअर्सना सांगितलं. सनानं पोस्ट केलेले व्हिडीओ आणि फोटो पाहता तिनं मालदिवला एकच कल्ला केल्याचं दिसत आहे.