औरंगाबाद : औरंगाबादेत अभिनेत्री झरीन खान एका शोरुमच्या उद्घाटनासाठी आली असताना बाहेर चाहत्यांचा गोंधळ झाला आणि त्यात बाउन्सर आणि चाहत्यांना हाणामारी झाली... या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आता खुद्द झरीन खान एका चाहत्याला मारत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. गर्दीतून झरीन खान बाउन्सरसोबत येत असताना काही लोकांनी तिचे कपडे ओढले, त्यामुळे चिडलेल्या झरीन खाननं मारहाण करायला सुरूवात केली. 


झरीनला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं तिचे तरुण चाहते जमले होते. आयोजकांनी कुठलाही पोलीस बंदोबस्त न ठेवता खासगी बाऊन्सर लावलेले होते. मात्र चाहत्यांनी गर्दी अचानक वाढल्यानं बाऊन्सर आणि लोकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर याचं पर्यावसान हाणामारीत झालं.


या गर्दीमुळे अभिनेत्री झरीन खानला तब्बल दोन तास शोरूममध्ये अडकून पडली होती. अखरे गर्दी कमी झाल्यानंतर झरीन खान निघाली.