Vidya Balan Bedroom Secret: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) तिच्या बिनधास्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. ती कायम कुठलीही गोष्ट असो ती एक स्पष्ट वक्ता असल्याने सोशल मीडियावर (Social media) तिचीच चर्चा असते. अशात विद्या बालन पुन्हा एकदा असं काही बोलली आहे ज्यामुळे चाहत्यांचा भुवया उंचावल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॉफी विथ करण या (Coffee with Karan) शोमध्ये अभिनेत्रीने आपले बेडरूम सीक्रेट (Bedroom Secret) शेअर केले आहेत. या शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना करण जोहर (Karan Johar) त्यांचा आयुष्यातील असे सीक्रेट विचारतो जे ऐकून आपल्याला धक्का बसतो. असेच काही प्रश्न करणने विद्या बालनला विचारले. त्यानंतर विद्याने जे उत्तरं दिली ती ऐकून आपण हैराण व्हाल. (Vidya Balan Bedroom Secret nmp)


करणने पहिला प्रश्न विचारला की, बेडरुममध्ये रात्री लाईट हवी की बंद आवडेल? त्यावर विद्या म्हणाली की, डिम लाइट. पुढचा प्रश्न होता की, कॅंडल्स की म्यूजिक, यावर तिने दोन्ही गोष्टीला पसंती दिली. 


करण जोहरचे प्रश्न इथेच थांबले नाही, तो पुढे विचारतो की, कॉटन शीट्स या सिल्क, यावर विद्या लगेचच म्हणाली कायम कॉटन कारण सिल्कवर कसं वाटतं मला माहिती नाही. करणच्या पुढील प्रश्नाने तर धक्काच दिला. त्याने विचारलं की, एक्टनंतर चॉकलेट, ग्रीन टी की अजून एक राउंड...


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)


यावर विद्या म्हणाली की, पाणी...तहान शमता शमता अजून तहान लागते.