Vidya Balan Bold Photo: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) स्टाइलची जेव्हा चर्चा असते, तेव्हा तिच्या साडीतील लूकला चाहते पसंती दर्शवतात. विद्या बालनलाही साडी नेसणं फार आवडतं. यामुळेच अनेक कार्यक्रमांमध्ये विद्या बालन साडी नेसलेल्या पारंपारिक पोषाखात दिसते. यामुळेच जेव्हा विद्या बालनने 'डर्टी पिक्चर'मध्ये (Dirty Picture) बोल्ड भूमिका निभावली होती, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान विद्या बालनचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या फोटोत विद्या बालन बोल्ड (Vidya Balan Bold Photo) अवतारात दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्या बालनने नुकतंच डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी (Dabboo Ratnani Annual Calender) फोटोशूट केलं. या फोटोशूटमध्ये विद्या बालनने पुन्हा एकदा आपली बिनधास्त बाजू दाखवली आहे. या फोटोत विद्या बालनने अंगावर एकही कपडा घातलेला नसून हातामध्ये कप आणि वृत्तपत्र पकडलं असल्याचं दाखवण्यात आलं आहे. दरम्यान दुसरीकडे विद्या बालनने गॉगल घातलेला असून पायात हिल्स आहेत. स्वत: विद्या बालनने इन्स्टाग्रामला (Instagram) हा फोटो शेअर केला आहे. विद्या बालनच्या या बोल्ड आणि फॅशनेबल फोटोची चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही चांगलीच चर्चा आहे. 


डब्बू रतनानी त्याच्या वार्षिक कॅलेंडरसाठी दरवर्षी फोटोशूट करत असतो. या फोटोशूटमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ह्रतिक रोशन असे अनेक सेलिब्रिटी सहभागी होत असतात. दरम्यान विद्या बालनच्या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. अनेकांनी या फोटोची तुलना 'डर्टी पिक्चर' चित्रपटातील भूमिकेशी केली आहे. तर काहींनी यावर मजेदार कमेंट केल्या आहेत. 



विद्या बालन परिणीता, इश्किया, नो वन किल्ड जेसिका, गुरु, कहानी, पा, द डर्टी पिक्चर अशा चित्रपटांसाठी ओळखली जाते. याशिवाय लगे रहो मुन्नाभाई, भूल भुलैय्या, मिशन मंगल, बेगम जानमधील तिच्या भूमिकांचंही कौतुक झालं आहे. शकुंतला देवी आणि शेरनी या चित्रपटांमध्ये ती शेवटची दिसली होती. सध्या ती दोन चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. यामधील एका चित्रपटाचं नाव 'नियत' आहे.