मुंबई : बॉलिवूडची बिनधास्त आणि अभिनयाची पावरहाऊस असलेली अभिनेत्री विद्या बालन सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत एका पार्टीनंतर स्पॉट झाली. या व्हिडिओची खास गोष्टी ही की, यात विद्या आपले पोट लपवताना दिसत आहे. त्यावरून विद्या बहुदा प्रेग्नेंट असावी, असे वाटते. 


पहा व्हिडिओ...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्याचा हा व्हिडिओ व्हायरल होताच तिचे चाहते तिला प्रेग्नेंसीबद्दल विचारत आहेत. वूमप्लाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. निर्माता रोनी स्क्रूवालाच्या पार्टीतून पतीसोबत बाहेर पडत असताना विद्या स्पॉट झाली. व्हिडिओत ती अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत बोलता बोलता बाहेर पडताना दिसत आहे. याचवेळेस ती दुपट्ट्याने पोट झाकत आहे.



विद्याकडून कोणतेही उत्तर नाही


या व्हिडिओनंतर विद्याला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत. पण यावर विद्याकडून कोणतेही उत्तर अद्यापही मिळालेले नाही. 


'तुम्हारी सुलू'नंतर काय?


२०१७ मध्ये प्रदर्शित झालेला विद्याच्या 'तुम्हारी सुलू' या सिनेमाला फिल्मफेअरचा बेस्ट फिल्म हा पुरस्कार मिळाला. पण सध्या विद्या कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहे, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.