मुंबई : विद्या बालन 5 सप्टेंबर, बुधवारी संध्याकाळी मुंबईतील खार येथे हॉस्पिटलजवळ दिसली. तिच्या क्लिनिक विझीटच्या दरम्यान मीडिया तिथे पोहोचली आणि तिचे तेव्हाचे सगळे फोटो क्लिक झाले. याच दरम्यान असं म्हटलं जाऊ लागलं की, विद्या बालन प्रेग्नेंट असल्यामुळे तर क्लिनिकमध्ये आली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी सगळी चर्चा असताना, विद्या बालनने स्वतः मीडियाशी संवाद साधला आणि आपण प्रेग्नेंट नसल्याचं सांगितलं. सगळ्या चर्चा अफवा असल्याचं तिने स्पष्ट केलं. मिड डे ने दिलेल्या माहितीनुसार, क्लिनिकमधून बाहेर पडताच विद्या बालन आपल्या कारसमोर थांबली मीडियाशी संवाद साधला की, मी गर्भवती नाही. कारण अशी कोणतीही अफवा पसरवू नको. विद्या बालन ज्या क्लिनिकमध्ये दिसली तिथे अनेक सेलिब्रिटींची डिलिव्हरी झाली होती. 


विद्या बालन आता एनटीआर बायोपिक सिनेमाचं हैदराबादमध्ये शुटिंग करत आहे. विद्या बालन एका अपार्टमेंटमध्ये शूट करत आहे.