मुंबई : आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री विद्या बालन सध्यातिच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आली आहे. खुद्द विद्यानेच केलेल्या खुलास्यामुळे या चर्चेला तोंड फुटले आहे. 'माझं एका तरुणावर प्रेम होतं, पण माझ्या बहिणीसाठी मला प्रेमाचा त्याग करावा लागला,' असे तिने सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या कार्यक्रमात विद्याने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. काही गुपितंही उघड केली. "प्रेमात मी शहीद झाले आहे, असं मी मानते. कारण मला एक मुलगा आवडायचा. पण त्याला माझी बहीण आवडायची. त्या दोघ डेट करत असल्याचं मला जेव्हा कळल तेव्हा मी स्वत: हून माघार घेतली," असं विद्याने सांगितलं. 


विद्या 'तुम्हारी सुलू' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात ती रेडिओ जॉकीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ नंतर अनेक वर्षांनी विद्या रेडिओ जॉकीची भूमिका साकारणार असल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.