नवी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन लवकर "तु्म्हारी सुलू" या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात विद्या बालनसोबत मानव कौल, नेहा धुपिया आणि आरजे मलिश्का देखील आपल्याला दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात विद्या बालन एका गृहिणीची भूमिका साकारत आहे. त्याचसोबत ती या सिनेमात लेट नाईट आरजेची भूमिका देखील साकारत आहे. तर मानव कौल हा सिनेमात विद्या बालनची भूमिका साकारत आहे. नुकतेच विद्या बालन आणि मानव सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिल्लीला आले होते. यावेळी त्यांनी इंडिया डॉट कॉमच्या प्रतिनिधीशी चर्चा केली. यावेळी सिनेमातील काही मजेदार किस्से आणि खास गोष्टी समोर आल्या. 


मुलाखती दरम्यान विद्या बालन आपल्याला प्रँक करताना दिसली. तसेच अगदी मजेशीर आणि मस्तीखोरपणे तिने या मुलाखतीत चर्चा केली. विद्या बालनचा हा सिनेमा १७ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा विद्या बालन फार महत्वाचा आहे कारण यंदाच्या वर्षी "बेगम जान" हा सिनेमा विद्याचा प्रदर्शित झाला. पण त्याला हवी तशी सफलता मिळाली नाही.