मुंबई : अभिनेत्री विद्या बालन आज प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनय, डान्स, सिनेमे इत्यादी गोष्टींमुळे ती कायम चर्चेत असते. आता देखील विद्या एका कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताचं विद्याने इन्स्टाग्रामवर  Ask Me Anything सेशन केलं. ज्यामध्ये विद्याने युजर्सच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मोकळेपणाने दिलं. सेशनमध्ये विद्याने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देखील दिलं. सध्या तिच्या या सेशनची तुफान चर्चा रंगत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका युजरने विद्याला विचारलं की, 'तू बोल्ड फोटोशूट का करत नाही...' युजरच्या प्रश्नाचं उत्तर देताना विद्या म्हणाली, 'सध्या प्रचंड उन्हाळा वाढतोय आणि एवढ्या उष्णतेत मी शुटिंग करत आहे. तर हे बोल्ड फोटोशूटचं झालं ना....' सध्या विद्याचं हे उत्तर तुफान व्हायरल होत आहे. 



त्यामुळे वाढणारी उष्णता विद्याला बोल्ड फोटोशूट करण्यापासून थांबवत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर दुसऱ्या युजरने विद्याला तुझं वजन किती आहे असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री म्हणाली, 'इंटरनेटवर माझ्या वयाबद्दल सर्व माहिती तुम्हाला कळेल...यासाठी तुम्ही गूगल करा....'


बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनचे (Vidya Balan) मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. विद्याने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. विद्याच्या प्रत्येक चाहत्याला ती आवडते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.