मुंबई : National crush actress Rashmika Mandanna : नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना ( Rashmika Mandanna) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणांमुळे सतत चर्चेत असते. रश्मिका ही लवकरच 'मिशन मजनू' या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, तिच्या लव्ह लाइफबद्दल पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. याबाबत आता रश्मिका मंदाना हिने मोठा खुलासा केला आहे. तिने आपल्या अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्यासोबतच्या नात्याबाबत मौन सोडले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून श्मिका मंदाना ( Rashmika Mandanna) तिच्या आगामी सिनेमासोबतच विविध कारणांमुळे चर्चेत आहे. 'पुष्पा' या सिनेमानंतर ती दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिची ओळख होत आहे. रश्मिका ही अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबतच्या नात्याबाबत सतत बोलले जात आहे. अनेकदा हे दोघेही एकत्र दिसले आहेत. त्यामुळे ते दोघे एकमेकांना टेड करत असल्याचे बोलले जात आहे. अलिकडेच रश्मिकाने विजय देवरकोंडाबद्दलच्या नात्यावर मोठा खुलासा केला आहे.


‘कॉफी विथ करण 7’मध्ये करण जोहर याने अभिनेता विजय देवरकोंडा याला त्याची लव्ह लाइफ आणि मैत्रिण रश्मिका मंदाना हिच्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर विजय देवरकोंडा म्हणाला, मी माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच रश्मिकासोबत दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती माझी डार्लिंग असून मला ती आवडते. माझ्यासाठी ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते.


 आता रश्मिकाने विजय देवरकोंडा याच्यासोबतच्या नात्याबद्दल मौन सोडत सांगितले की, कधी कधी मला असे वाटते की मी वर्षातून पाच चित्रपट करते आणि तुम्ही येता आणि मला विचारता की मी कोणाला डेट करत आहे. तसेच माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरु आहे. याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असते. पण मला आता समजले आहे की, आम्ही कलाकार आहोत. त्यामुळे आमच्याबद्दल सतत चर्चा होत असतात आणि लोकांना आमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडते. 



आम्ही कलाकार म्हणून काम करताना भेटीगाठी होत असतात. तसेच सिनेमाबाबत बोलायचे झाले तर तो कधीपर्यंत प्रदर्शित होणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगू शकते. पण मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल काहीही बोलायचे नाही. मी असं म्हणत नाही की मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही सांगायचे नाही. पण जोपर्यंत मला एखाद्या गोष्टीबद्दल खात्री होत नाही. मी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी याबद्दल बोलणार नाही, असे तिने नातेसंबंधावर होत असलेल्या चर्चेवर सांगितले.