मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट जगतातील एक लोकप्रिय अभिनेता vijay deverakonda याच्या नावाला आता विविधभाषी प्रेक्षकांकडूनही चांगली लोकप्रियता मिळत आहे. सध्या विजय चर्चेत आहे ते म्हणजे त्याचा आगामी चित्रपट 'Liger' मुळे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी चित्रपटाच्या निमित्ताने विजय पहिल्यांदाच बॉक्सिंगचा देव मानल्या जाणाऱ्या माईक टायसन याच्याशी स्क्रीन शेअर करणार आहे. या साऱ्याच्या चर्चा सुरु असतानाच आता विजयच्या खासगी आयुष्याबाबतही बऱ्याच चर्चांना वाव मिळू लागला आहे. 


विजय कोणाला डेट करत आहे, त्याचं नाव कोणाशी जोडलं जात आहे असेच अनेक प्रश्न त्याचे चाहते उपस्थित करताना दिसत आहेत. 


एका व्हिडीओच्या निमित्तानं खुद्द विजयनेच या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. विजय त्याचा भाऊ आनंद याच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. त्यासाठीच्या एका युट्यूब व्हिडीओमध्ये त्याने खासगी आयुष्याबाबत खुलासा केला. 


'तू कोणाला डेट करत आहेस का?', असा प्रश्न विचारला असता हल्लीच माझा हार्ट ब्रेक झाल्याचं त्याने स्पष्ट केलं. त्याच्या या एका उत्तरानं अनेक प्रश्न युजर्सनी उभे केले. 


कोणी ब्रेकअप केला, कोण होती ती, कसं झालं हे सारं वगैरे वगैरे... या सर्व प्रश्नांचा भडिमार पाहून आनंदनं उत्तर देत विजयचा हार्ट ब्रेक तसाच झाला, 'जशी चित्रपटातून माझी लिडींग लेडी पळून गेली', या शब्दांत उत्तर दिलं. 


दरम्यान, गेल्या वर्षी अशाही चर्चा रंगल्या होत्या की, विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे एकमेकांना डेट करत आहेत. 'गीता गोविंदम' चित्रपटाच्या निमित्तानं त्यांच्यातील सुरेख केमिस्ट्रीही चाहत्यांना पाहता आली होती. रुपेरी पडद्यावर झळकलेल्या या जोडीला अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. पण, अद्यापही त्यांच्या नात्याचं गुपित मात्र गुलदस्त्यातच आहे.