...म्हणून Vijay Deverakonda 199 रुपयांची चप्पल घालून चित्रपटाच्या प्रमोशनला पोहोचला
विजय देवरकोंडाने चित्रपटाच्या प्रमोशनला का घातली 199 रूपयांची चप्पल? स्टायलिस्टने सांगितले कारण
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा 199 रूपयाची चप्पल घालून चित्रपटाच्या प्रमोशनला पोहोचल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर त्याच्या साधेपणाचे खुप कौतूक होत होते. मात्र तो नेमके अशी चप्पल घालून प्रमोशनला का पोहोचला होता याचे कारण समोर आले नव्हते. आता याचे उत्तर विजयच्या स्टायलिस्टने दिले आहे.
अभिनेता म्हटलं तर लाईमलाईट, चारही बाजूंना कॅमरे, मीडियाचा गराडा आलाच, मात्र या सर्व गोष्टींची पर्वा न करता विजय देवराकोंडा थेट टी-शर्ट-कार्गो पँटसह चप्पल घालून ट्रेलर लॉंच सोहळ्यात पोहोचला होता. याच सोहळयाला करण जोहर आणि अनन्या पांडे एकदम टापटीप आले होते. त्यामुळे विजय या दोघांमध्ये वेगळाच वाटत होता. मात्र इतक्या साध्या लुकमध्ये देखील त्याचीच चर्चा होत होती.
विजय देवरकोंडा 199 रूपयांची चप्पल घालून ट्रेलर सोहळ्याला का पोहोचला होता याचे कारण समोर आले नव्हते. मात्र आता या संदर्भातल्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर विजयच्या स्टायलिस्टने यावर उत्तर दिले आहे.
स्टायलिस्ट काय म्हणाला?
विजय देवरकोंडाचा स्टायलिस्ट हरमनने आता एका मुलाखतीत या लूकमागचं कारण स्पष्ट केले आहे.विजयलाही सुपर स्टायलिश लूक देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.पण शेवटच्या क्षणी विजयच्या सांगण्यावरून त्याचा लूक बदलण्यात आला होता.
खरं तर, विजयची इच्छा होती की लीगरमधील त्याच्या व्यक्तिरेखेचा ट्रेलर लॉन्चच्या वेळी असाच लूक असावा.म्हणून त्याने चप्पल मागवली आणि ती परिधान करून तो कार्यक्रमाला पोहोचला आणि त्याची आयडिया खरोखरच चालली. कारण तेव्हापासून या कार्यक्रमात फक्त लीगरच्या ट्रेलरची आणि विजयच्या लूकचीच चर्चा आहे.