मुंबई : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) त्याच्या आगामी  'लिगर'  (liger) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. देशभरातील विविध राज्यात जाऊन तो त्याच्या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहे. त्याच्या प्रत्येक प्रमोशनची तुफान चर्चा होतेय. त्यात आता एका पत्रकार परिषदेतला त्याच्या एका कृतीवर चाहते संतापले. त्याला या कृतीवरून ट्रोलही केली जातेय. नेमकं त्याने पत्रकार परिषदेत काय केलंय हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकार परिषदेत काय झालं?
विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) अनन्या पांडेसोबत (ananya pandey)  'लिगर'  (liger) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत पोहोचला होता. या पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने विजयला सांगितले की, मी टॅक्सीवाला चित्रपटाच्या वेळी तुमची मुलाखत घेतली होती. पण सध्या तू खूप मोठा स्टार झाला आहेस, त्यामुळे आता तुला प्रश्न करायला मला संकोच वाटतोय. 


यावर विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांनी आपण कन्फर्टेबल होऊया असं म्हणत, आरामात समोरच्या टेबलावर पाय ठेवला. त्यासोबतच विजयने त्या पत्रकाराला तसे करण्यास भाग पाडले. विजयची ही कृती अनेकांना रूचली नाही. यामुळे अनेकांनी त्याला  सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. यासोबतच त्याच्या लिगर या चित्रपटालाही लक्ष्य करण्यात आले.



विजय देवरकोंडा काय म्हणाला? 
सोशल मीडियावर त्या कृत्यासाठी ट्रोल झाल्यानंतर, लीगर स्टारर विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आणि लिहिले की, जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यात पुढे जाते तेव्हा लोक त्यांना लक्ष्य करू लागतात. अशा परिस्थितीत आम्ही ही लढाई लढत राहू. पण जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि तुम्हाला सर्वांचं चांगले पाहायचं असेल तर देव आणि लोकांचे प्रेम तुम्हाला साथ देईल, असे म्हणत त्याने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले. 


दरम्यान येत्या 25 ऑगस्टला विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) लिगर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.