रश्मिका-विजय देवरकोंडा यांच्या रिलेशनशिपबाबत सत्य अखेर समोर
साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हे सध्या चर्चेचा भाग आहेत.
मुंबई : साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हे सध्या चर्चेचा भाग आहेत. दोघंही प्रोफेशनल लाईफमुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेचा भाग ठरले आहेत. रिपोर्ट्सनुसार दोघंही एकमेकांना डेट करत आहेत.
अनेकदा दोघंही डिनर किंवा लंच डेटवर एकत्र स्पॉट झाले आहेत. विजय आणि रश्मिका यांच्या नात्याची सगळीकडे चर्चा आहे. पण आता त्यांच्या नात्याबद्दल अशी बातमी समोर आली आहे की, हे ऐकून सर्वांनाच धक्का बसेल. रश्मिका आणि विजयचं ब्रेकअप झालं आहे आणि ते आत्ताचं नाही तर 2 वर्षांपूर्वीच झालं आहे.
एका रिपोर्टनुसार, रक्षित शेट्टीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रश्मिका आणि विजय एकमेकांना डेट करत होते. रक्षितसोबतची एंगेजमेंट तोडल्यानंतर दोघांनी त्याच काळात 'गीता गोविंदम', 'डियर कॉमरेड' या चित्रपटात एकत्र काम केलं. जिथे दोघांना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळाली.
2 वर्षांआधीच तुटलं नातं
या चित्रपटानंतर रश्मिका-विजय वेगळे झाले. दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही, त्यामुळे दोघंही वेगळे झाले. रश्मिका आणि विजयचं ब्रेकअप दोन वर्षांपूर्वीच झालं होतं आणि याचं कारण अद्याप कोणालाच माहित नाही.
दोघे चांगले मित्र आहेत
विजयसोबत ब्रेकअप झाल्यापासून रश्मिका सिंगल आहे. यावेळी दोघंही एकमेकांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. दोघंही खूप चांगले मित्र आहेत पण विजय-रश्मिका यांच्यात आता प्रेम नाही. दोघांचेही मार्ग आता वेगळे झाले आहेत.