Vijay Sethupathi Weight Loss : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेला विजय सेतुपती (Vijay Sethupathi) त्याच्या चित्रपटातील अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र प्रथमच तो त्याच्या नवीन लुक मुळे चर्चेत आला आहे. त्याचा हा लुक पाहुन चाहते थक्क झाले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय सेतुपतीने (Vijay Sethupathi Weight Loss) नुकताच त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तो खुपच बारीक दिसत आहे. त्याचा हा  नवीन लुक पाहून सर्वेच चकीत झाले आहेत. खरंतर विजयने त्याचे वजन घटवलं आहे. हे वजन घटवल्यानंतर त्याने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहत्यांना विश्वास बसत नाही आहे.  
 
दरम्यान विजयने (Vijay Sethupathi) पोस्ट केलेल्या फोटोवर अनेक लाईक आणि कमेंटस येत आहेत. सेतुपतीच्या चाहत्यांनी त्याच्या नवीन लूकचे कौतुक केले. एका चाहत्याने "Vjs Back to Naanum Rowdy Dhan Look and Physique.." असे लिहिले. यासह अनेक भन्नाट कमेंट येत आहेत. त्याता आता त्याचा हा लुक ऑनस्क्रिन पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 



विक्रम या सिनेमातील विजयच्या (Vijay Sethupathi Weight Loss) अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतूक केले होते. या चित्रपटात खलनायिकी ड्रग डिलरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिनेता कमल हसन, फहद फासिल झळकला होता. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला. 


दरम्यान पुढच्या वर्षी रिलीज होणार्‍या शाहरुख खान (Shahrukh khan) , नयनतारासोबत विजय सेतुपती (Vijay Sethupathi) जवान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली यांनी केले आहे. यासह ‘मुंबईकर’, ‘मेरी ख्रिसमस’, ‘मायकल’ आणि ‘विदुथलाई’ या आगामी चित्रपटात विजय दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.