Vijay Setupati Chappal Photo: सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे ती म्हणजे जवान या चित्रपटाची. नुकतीच या चित्रपटाची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यामुळे शाहरूख खाननं आणि या चित्रपटातील कलाकारांनी यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधला होता. त्यातून यावेळी चर्चा रंगली होती म्हणजे विजय सेतुपती याची. या चित्रपटातून तो खलनायकाच्या भुमिकेतून दिसतो आहे. या प्रेस कॉन्सफरन्सला आलेल्या विजय सेतुपतीच्या चपलांकडेच सर्वांचे लक्ष गेले होते. चित्रपट हा 700 कोटींपर्यंत पोहचला आहे त्याचसोबत स्वत: विजय सेतपुतीची ती चप्पल पाहून नेटकऱ्यांनाही धक्काच बसला होता. त्यानं यावेळी महागडी ब्रॅण्डेड चप्पल घातलीच नव्हती. त्यानं अगदी साधी चप्पल घातली होती. त्यामुळे त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. यावेळी अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच्या जमान्यात रणवीर सिंग हा फॅशन आयकॉन आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. आता यावेळी चर्चा आहे ती म्हणजे विजय सेतुपती यांची. त्याच्या साधेपणानं मात्र सर्वांचीच मनं जिंकली आहेत. यावेळी त्यानं फारच साधे कपडे घातले होते. इतका मोठा स्टार हा इतके साधे कपडे घातलो हे पाहून चाहत्यांनाही धक्काच बसला होता. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. याआधीही अशाच अनेक प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यानं आपला कपड्यांच्या बाबतीतला साधेपणा दाखवला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या जवानच्या प्रेस कॉन्सफरन्सच्या लुकची. यावेळी विजय सेतुपतीनं एन्ट्री घेताच यावेळी त्याच्या लुकचं चाहत्यांनी कौतुक केले. 


हेही वाचा : 'मला फसवलं...'; Jawan फेम अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर खळबळजनक आरोप, विजय सेतुपतीचं नाव घेत काय म्हणाली?


सध्या बॉक्स ऑफिसवर जवान हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता हा चित्रपट 700 कोटीच्या घरात गेला आहे. तेव्हा शाहरूख खानच्या पहिल्या पठाण या चित्रपटाचा विक्रम हा जवान हा चित्रपट गाजतो आहे त्यामुळे पठाणचाही रेकॉर्ड मोडणार अशीही चर्चा रंगलेली दिसते आहे.



पहिल्याच दिवशी या चित्रपटानं 75 कोटी कमावले होते. त्यातून आत्तापर्यंत देशभरात हा चित्रपट हा 400 कोटी पार करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वी जगभरात या चित्रपटानं 600 कोटी कमावले होते. ट्रेड विश्लेषकाच्या अंदाजानुसार त्याच्या पुढील काही दिवसांतच हा चित्रपट 100 कोटी अजून कमावले याचीही जोरात चर्चा रंगलेली होती आणि आता हे चित्र अगदी स्पष्ट होताना दिसत आहे.