Vijay Varma Shared His Death Post : अनेकदा सेलिब्रिटी कळत-नकळत असं काही करतात ज्याचा त्यांना पश्चाताप होतो. इतकंच नाही तर चाहत्यांना दुखावल्यामुळे ते नंतर माफी मागताना दिसतात. असंच काहीसं बॉलिवूड अभिनेता विजय वर्माच्या बाबतीत घडलं आहे. विजय वर्मानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत त्यानं RIP असं देखील म्हटलं. त्याची ही पोस्ट पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. त्याची पोस्ट पाहिल्यानंतर सगळ्यांना वाटलं की त्याचं निधन जालं आहे. पण नक्की काय प्रकरण आहे हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर दोन वर्षांपूर्वी विजयचा नेटफ्लिक्सवर एक चित्रपट आला होता. या चित्रपटात त्यानं हमजा शेख ही भूमिका साकारली होती. त्या चित्रपटात आलिया भट्टनं त्याची पत्नी बदरूनिस्सा 'बदरू' अंसारी शेख ही भूमिका साकारली होती. बदरू तिचा पती हमजाला इतकी कंटाळली असते की ती तिच्या आईसोबत मिळून त्याचा मर्डर प्लॅन करते. हेच कारण आहे की विजयनं चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर हमजाचा फोटो शेअर करत RIP म्हटलं. दरम्यान, विजय वर्माला त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर तब्बल 1.3 मिलियन लोक फॉलो करतात. अशात जेव्हा त्यांनी सगळ्यांनी ही पोस्ट पाहिली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला.



जेव्हा विजयला वाटलं की त्याची ही मस्करी चाहत्यांना कळली नाही. तर त्यानं त्याचं पोस्टवर कमेंट करत म्हटलं की 'मित्रांनो मला माफ करा, मी हे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही केल. हा चित्रपटातून घेण्यात आलेला स्क्रीनशॉट आहे. डार्क कॉमेडी बनवली होती तर पोस्ट केली.' विजयनं ही कमेंट केल्यानंतर एक नेटकरी म्हणाली, 'मी तर घाबरलेच होते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'एक मिनिटासाठी मला हे खरं आहे असं वाटलं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'परत असं करू नकोस.' 


हेही वाचा : किसिंग सीन करण्यापूर्वी महेश मांजरेकरांनी 5 वेळा हात धुतले! नेहा धुपिया म्हणाली, 'मी विवाहित...


विजय वर्मानं ज्या डार्लिंग्स या चित्रपटाचा हा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा एक ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जसमीत के रीमनं केलं आहे. या चित्रपटात विजय वर्मा, आलिया भट्ट आणि शेफाली शाह महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा चित्रपट 5 ऑगस्ट 2022 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.