Vijay Varma : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांची जोडी ही 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटामुळे चर्चेत होते. त्यानंतर त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या. त्या दोघांचा गेल्या वर्षी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत ते दोघे नवीन वर्षाचं स्वागत करत असताना किस करताना दिसले. त्यानंतर त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपची कबूली दिली. दरम्यान, काल ते दोघं मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. त्यावेळी पापाराझींनी विजय वर्मावर अशा कमेंट केल्या की त्याचा हसणारा चेहरा हा लगेच रागात बदलला. त्याचं कारण त्यांची मालदीव्हची सुट्टी ठरली. तमन्नानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले. या फोटोंवरून विजयची काही पापाराझींनी कमेंट केली. त्यानंतर मात्र, विजय वर्मानं त्याना खडे बोल सुनावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तमन्ना जेव्हा तिच्या गाडीवर जात असते तेव्हा पापाराझी तिच्या मालदीव्हसच्या फोटोंवर कमेंट केली आहे. तमन्नानं यावर हसून रिअॅक्ट केलं. पण विजयच्या बाबतीत असं झालं नाही. विजय वर्मा विमानतळावरून येत असताना पापाराझी त्याचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करत त्यावेळी एक म्हणाला, मालदीव के समंदर के मजे ले के आए हो... त्यानंतर विजय चिडला आणि पापाराझींना म्हणाला की 'अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही बोलू शकत नाही.'


हेही वाचा : VIDEO : सई ताम्हणकरनं मुंबईत खरेदी केलं स्वत:चं पहिलं घर! मात्र जुन्या घरातून पाय निघेना


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


विजय आणि तमन्ना यांचं रिलेशनशिप हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. त्यात सगळ्यात जास्त चर्चा ही नेटफ्लिक्सवर 'लस्ट स्टोरीज 2' नंतर होती.  त्या दोघांमधील इंटिमेट सीन हे चर्चेचा विषय ठरले होते. त्या दोघांना या चित्रपटाच्या सेटवर सुरुवातीला चांगली मैत्री झाली आणि मग मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजयनं त्याच्या रिलेशनशिपविषयी बोलताना सांगितलं की तो कधी कोणत्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये नव्हता. पण तमन्ना भाटियानं माझं विचार बदलले. तमन्नाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सगळ्यात शेवटी आखिरी सच या वेब सीरिजमध्ये दिसली होती. तर विजय वर्माविषयी बोलायचे झाले तर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या जाने जा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विजय वर्मा हा करीना कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. करीना या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे.