विजयगाथा सुवर्णकमळ विजेत्या कासवाची...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कलासंस्कृती परिवार पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने `विजयगाथा कासवाची` या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.
पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कलासंस्कृती परिवार पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 'विजयगाथा कासवाची' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.
पाचव्यांदा मराठी चित्रपटाला सुवर्णकमळ मिळवून देण्याचा मान 'कासव' या चित्रपटाने दिला. या चित्रपटाची निर्मिती ते राष्ट्रीय पारितोषिक म्हणून मिळवलेले 'सुवर्णकमळ' हा सर्व प्रवास या निमित्ताने उलगडला जाणार आहे.
'कासव'चे निर्माते डॉ. मोहन आगाशे, दिग्दर्शक द्वयी सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर तसेच कलाकार आलोक राजवाडे, इरावती हर्षे व इतर सहकलाकार यानिमित्तानं चित्रपटाची सर्व टीम या निमित्तानं उपस्थित राहणार आहे.
'कासव' टीमच्या कौतुकासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले, पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरिष बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थजी धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष, मुरलीधर मोहोळ आदी हजर राहणार आहेत.
'कासव' चित्रपटाचे अंतरंग उलगडून दाखविण्याचे काम जेष्ठ पत्रकार राज काझी करणार आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांना विनामूल्य असणार आहे.
१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.०० वाजता पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता, पुणे इथं हा कार्यक्रम पार पडणार आहे.