`प्रेमी आहे की रेपिस्ट?` विकास दिव्यकीर्ति यांनी `डर` मधल्या शाहरुखच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न? अमिताभ यांच्या `मर्द` चाही केला उल्लेख
Vikas Divyakirti on Shah Rukh Khan Darr : विकास दिव्यकीर्ति यांनी शाहरुख खानच्या `डर` चित्रपटातील भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न
Vikas Divyakirti on Shah Rukh Khan Darr : यश चोप्रा यांच्या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर ते नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. त्यांचे सगळेच चित्रपट हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायचे. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी यश चोप्रा यांच्या 'जब तक है जान' या चित्रपटाच्या डायलॉग्सवर टीका केली होती. आता यावर डॉ. विकास दिव्यकीर्ति यांनी देखील 'डर' या चित्रपटाचा उल्लेख केला आणि त्यात शाहरख खानच्या भूमिकेविषयी त्यांना काय वाटतं हे सांगितलं आहे. या चित्रपटा विषयी त्यांना कोणती चिंता आहे याविषयी आणि त्यासोबत अमिताभ बच्चन यांच्या 'मर्द' या चित्रपटाचा देखल उल्लेख त्यांनी यावेळी केला.
विकास दिव्यकीर्ति यांनी We Are Yuva या यूट्यूब चॅनलशी बोलताना सांगितलं की 'मर्द हा चित्रपट आला होता तेव्हा आम्ही छोटे होतो. त्या चित्रपटात किती घाणेरड्या गोष्टी होत्या की आता बाळाचा जन्म झालाय आणि दारा सिंग जात आहेत. चाकूनं त्याच्या छातीवर लिहिलं की मर्द, किंवा रक्तानं लिहिलं की मर्द आणि मग त्या चित्रपटात काय दाखवण्यात आलं की पुरुषाला कधीच त्रास होत नाही. सगळं बालपण याच गोंधळात जात की आम्हाला त्रास झालाच नाही पाहिजे. हा किती मूर्खपणा आहे.'
विकास दिव्यकीर्ती यांनी पुढे सांगितलं की "90 च्या दशकात डर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात पहिल्यांदा मस्क्यूलन म्हणजेच पुरुषुत्व दाखवण्यात आलं. हे अॅनिमल वगैरेतर फार नंतरची गोष्ट आहे. यात शाहरुख खान आहे आणि जूही चावला आहे, ती नकार देते आणि तो गाणं गातो की 'तू हां कर या न कर,तू है मेरी किरण'. तात्पर्य तिच्या होकार किंवा नकाराशी त्याला काहीही नाही. तू हो बोललीस तरी, तू नकार दिलास तरी तू माझीच आहेस. हा प्रेमी आहे की रेपिस्ट आहे. हा कोणता सेंस आहे. याला म्हणतात की क्रूड मस्कुलॅनिटी."
हेही वाचा : 'रामायण'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल तर बिग बींवर 'ही' मोठी जबाबदारी
विकास दिव्यकीर्तिनं पुढे म्हणाले की, "कभी कभी मेरे दिल में एक ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए, काय म्हणायचं... तू एक वस्तू आहेस. माझ्यासाठी बनवण्यात आली आहे. तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं, तुझे जमीं पर बुलाया गया है मेरे लिए. मी कोणता असा लॉर्ड साहेब आहे की माझ्यासाठी तुला आभाळातून बोलावण्यात आलं. तुला काही स्वत: चं आयुष्य नाही, तुझं स्वत: चं काही करिअर नाही आहे? तुझे काही स्वप्न नाहीत. असं नाही की महिलांसाछी अशा गोष्टी करत नाही. पुरुष देखील अनेकदा ऑब्जेक्टिफाईड होतात. पण पुरुषांचं बोलणं जास्त दिसतं. स्त्रीयांचं बोलणं कमी दिसतं."