मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या मेहंदी कार्यक्रमाला क्रिकेट आणि बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. तर अनेक सेलिब्रिटी हे त्यांच्या जोडीदारासोबत आले होते. जसे की माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, विद्या बालन मात्र, त्यांच्यात कतरिना ही नव्हती. त्यामुळे अर्थातच या कार्यक्रमात एकट्या विकीनं हजेरी लावली होती. कतरिना या कार्यक्रमाला का आली नाही असे प्रश्न उपस्थित होताच. त्यावर विकीनं स्पष्टीकरण दिलं आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा मेहंदी कार्यक्रम जियो वर्ल्ड सेंटर मध्ये पार पडला. या कार्यक्रमात बरेच सेलिब्रिटी त्यांच्या कुटुंबासोबत सहभागी झाले होते. मात्र यावेळी अभिनेता विकी कौशलसोबत कतरिना न आल्यामुळे बऱ्याच चर्चा रंगल्या. कतरिना न येण्याचं कारण विचारत ती गरोदर तर नाही ना ? अशा चर्चा रंगू लागल्या. याआधी सुद्धा कटरीना गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. काही दिवसांपूर्वी कटरीना आणि विकी सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला गेले होते, तेव्हा त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले . कटरीनाचे फोटो पाहून अनेकांनी हे बेबी बंप असल्याचं म्हटलं होतं, मात्र तेव्हा विकीने  गुड नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 


आता पुन्हा कचरिना गरोदर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे या सागळ्याला पुर्ण विराम देत विकीने स्पष्टीकरण दिलं आहे. कटरीना कार्यक्रमाला का आली नाही ? असं विचारताच विकी म्हणाला की, कटरीना सध्या मुंबईबाहेर कामासाठी गेली आहे. त्यामुळे ती कार्यक्रमाला येऊ शकली नाही. अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात विकीने काळ्या रंगाचा पारंपारिक आऊटफिट परिधान केला होता. या ड्रेसमधले     विकीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये त्याचा लूकवर चाहते फिदा झाले. त्याचे हे फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत आहेत. विकीच्या नव्या सिनेमाबद्दल सांगायचं तर, बॅड न्यूज हा त्याचा आगामी सिनेमा 19 जुलैला चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात विकीसोबत तृप्ती डीमरी, अमय वर्तक, नेहा धुपिया हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन आनंद तिवारीने केलं असून जूनमध्ये या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला.