सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड विक्रम भट्टने तिच्या नव्या नात्याबद्दल सोडले मौन
सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्याला अनेक जण ट्रोल करत असले तरी काही जण तिला सपोर्ट करताना दिसत आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या चर्चेत आहे. सगळीकडे सध्या तिचीच चर्चा आहे. कारण ही त्याला तसंच आहे. सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. एकीकडे बॉलिवूड सेलिब्रिटी तिचे अभिनंदन करत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर यूजर्स तिला ट्रोल करत आहेत.
यूजर्स या नात्यावर आक्षेपार्ह कमेंट करत आहेत. ललित मोदीला डेट करण्यासाठी अनेक लोक सुष्मिताला 'गोल्ड डिगर' म्हणत आहेत. या सगळ्या दरम्यान सुष्मिता सेनचा कथित एक्स बॉयफ्रेंड आणि चित्रपट निर्माता विक्रम भट्ट याने अभिनेत्रीच्या या नात्यावर वक्तव्य केले आहे.
मीडिया हाऊसशी बोलताना विक्रम भट्ट म्हणाला, "सुष्मिता एक 'लव्ह डिगर' आहे, 'गोल्ड डिगर' नाही. कोणाची शोकांतिका कोणाची तरी करमणूक होत आहे. हे नेहमीच असेच राहिले आहे. करीनाने सैफशी लग्न केले तेव्हाही लोकांनी तिला ट्रोल केले. तुम्ही सेलिब्रिटी असाल आणि नेटिझन्सना विचित्र वाटणारा कोणताही निर्णय घेतला तर ते तुम्हाला ट्रोल करायला लागतात.''
विक्रम भट्ट पुढे म्हणतात, “प्रेमात पडण्यापूर्वी सुष्मिता कधीही कोणाचा बँक बॅलन्स तपासत नाही. मी 'गुलाम' चित्रपट दिग्दर्शित करत होतो, पण माझ्याकडे पैसे नव्हते. सुष्मिता मला अमेरिकेत घेऊन गेली आणि माझा सर्व खर्च तिनेच उचलला. जेव्हा आम्ही लॉस एंजेलिसमध्ये पोहोचलो तेव्हा लिमोझिन पाहून मला आश्चर्य वाटले. जेव्हा मी तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की तिला माझी अमेरिकेत एन्ट्री खूप खास करायची आहे.”
ललित मोदी यांनी काही दिवसापूर्वी सुष्मिता सेन सोबतचे काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. सुष्मिताने देखील ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.