Vikram Gokhale Health News : विक्रम गोखले यांची प्रकृती पुन्हा खालावली
विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून मोठी Update
Vikram Gokhale Health update : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेटसमोर आली आहे. विक्रम गोखले अद्यापही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. रक्तदाब सुरळीत ठेवण्यासाठी औषधे चालू आहेत अशी माहिती दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी याडगीकर यांनी दिलीय.
शुक्रवारी गोखले यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली होती. पण आज पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्यामुळे चाहते चिंतेत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram gokhale ) यांच्या निधनाच्या अफवा उठलेल्या असताना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या साऱ्याला पूर्णविराम दिला.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे गोखलेंच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती देणारं Health Bulletine जारी करण्यात आलं त्यातून ही माहिती समोर आली. सध्याच्या घडीला गोखले यांच्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय असल्याची माहितीही त्यांनी दिली.
काय म्हणाले डॉक्टर आणि निकटवर्तीय?
'ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. गेल्या 24 तासांपासून ते जगण्यासाठी झुंज देत आहेत. त्यांच्या शरीरातील विविध अवयव निकामी झाले असून, सध्या डॉक्टांची टीम त्यांच्या परीनं शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत', असं गोखले यांचे निकटवर्तीय राजेश दामले माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.