Vikram Gokhale Passes Away: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि जेष्ठ नेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचं आज निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात (Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. यावेळी अनेकजण त्यांच्या आठवणींना उजाळा देतायत. गोखले यांनी अनेकदा मनाचा मोठेपणा दाखवला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना काळात गोखले यांनी नाणे गावातील पौड जवळील स्वमालकीचा एक एकराची जागा महामंडळाच्या नावे करून दिली होती. त्यावेळी त्या जागेची बाजार भावानुसार किंमत जवळपास अडीच कोटी रुपये इतकी होती. या दान केलेल्या जागेवर ज्येष्ठ आणि एकटे राहणाऱ्या कलावंतांना आसरा मिळावा, यासाठी मोफत राहण्याची सोय करण्याचा निर्णय विक्रम गोखले यांनी घेतला होता.


त्यानुसार विक्रम गोखले यांनी त्याची ही पूर्ण जमीन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली. त्यांच्या या कृत्याचं खूप कौतुक झालं होतं. 


ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोखले यांची  प्रकृती गेल्या काही दिवसांपासून  खालावली होती. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.


विक्रम गोखले हे मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक मोठं नाव. त्यांनी अनेक मराठी,हिंदी सिनेमा, मालिकांसह रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची छाप उमटवली. पण, आज या अभिनेत्यानं चाहत्यांमधून एक्झिट घेतली आणि अनेकांच्याच डोळ्यात अश्रू उभे राहिले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शनिवारी सायंकारी 4 वाजण्याच्या सुमारास गोखले याचं पार्थिव ठेवण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.