Vikrant Massey : बॉलिवूड अभिनेत्री विक्रांत मेसी गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट 'फिर आई हसीन दिलरुबा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि सनी कौशलसोबत लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. विक्रांतचा चित्रपट '12 वी फेल' हा चांगलाच चर्चेत होता. दरम्यान, आता विक्रांत हा 'फिर आई हसीन दिलरुबा' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत विक्रांतनं न कळत न सांगत, सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ काढणाऱ्यांवर असलेला राग व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रांतनं ही मुलाखत मॅशेबल इंडियाला दिली होती. या मुलाखतीत विक्रांतनं सांगितलं की एकदा तो त्याच्या चाहत्यावर प्रचंड चिडला होता. तो चाहता त्याच्या प्रायव्हसीचा विचार न करता त्याचे फोटो काढू लागला. याविषयी विक्रांत म्हणाला, 'मी असं बोलायला नको, पण माझा अशा लोकांसोबत खूप वाद होतो, जे लपून छपून तुमची रेकॉर्डिंक करतात. कधी तुम्ही खात असता कधी तुम्ही तुमच्या स्टाफसोबत घरातला सामान खरेदी करत असता आणि ते लोक लाइव्ह करू लागतात.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

विक्रांनं पुढे सांगितलं की एक दिवस, (विमानतळावर) मी फक्त सिक्योरिटी चेक क्रॉस केलं होतं. मी माझ्या टी-शर्टला टकइन केलं आणि कोणीतरी नुकतंच सिक्योरिटी चेक करून बाहेर आलं होतं. तर ती व्यक्ती माझं रेकॉर्डिंग करत होती. मी म्हणालो, तुम्ही काय प्राणी संग्रहालयात आलात का? थोडी काही मर्यादा ठेवा. तुम्ही मला विचारा आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत येऊन फोटो क्लिक करेन आणि ते देखील आनंदानं. त्यात काहीही समस्या नाही. पण जेव्हा तुम्ही कोणाच्या स्पेसचा मान-सन्मान करत नाही. तेव्हा अशा अनेक समस्या उद्भवतात. 


हेही वाचा : परवीन बाबीच्या मृत्यूचं रहस्य अखेर समोर येणार; Animal फेम तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत


गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या विक्रांतच्या '12वीं फेल' या चित्रपटाची सगळ्यांनी स्तुती केली. चित्रपटाच्या पटकथेसोबत विक्रांतच्या कामाची देखील स्तुती करण्यात येत होती. आता त्याचा आगामी चित्रपट 'फिर आई हसीन दिलरुबा' दिसणार आहे. हा त्याच्या 'हसीन दिलरुबा' या चित्रपटाचा सीक्वल असणार आहे. तापसी पन्नू आणि सनी कौशलसोबत तो या चित्रपटात दिसणार असून 9 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.