मुंबई : आरं थांब..... आरं ऐक असं म्हणत काही वर्षांपूर्वी एक तरुण सोशल मीडियावर गाजला. बघता बघता याच तरुणाने युट्यूब जगताममध्ये त्याचं नाव केलं. वेगळी ओळख तयार केली. दादूस, या नावानं तो कमालीचा प्रसिद्ध झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनायक माळीचा दादूस होत असतानाच आगरी भाषा आणि समाजही तितकाच लोकप्रिय झाला. 


एक आगरी तरुण आणि त्याच्यासोबत घडणारे काही विनोदी किस्से विनायक माळीने ज्या अंदाजाच प्रेक्षकांसमोर आणले ते पाहण्याजोगे. 


असा हा सर्वांनाच खळखळून हसवणारा विनायक आयुष्यातील अशा एका टप्प्यावर आला आहे जिथं त्याला प्रतीक्षा असणाऱ्या कुणाचीतरी खास एंट्री झाली आहे. 


खुद्द विनायकनंच त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरुन याची माहिती दिली. त्याच्या आयुष्यात आलेली ती म्हणजे विनायकची नवीकोरी कार. 


विनायक माळी यानं नुकतीच मर्सिडीज बेन्झ सी क्लास ही कार खरेदी केली. कार खरेदी केल्यानंतर पेपरवर्क आणि कारची पहिली झलक त्यानं सर्वांच्याच भेटीला आणली. 



स्वत:च्या कमाईतून कार खरेदी करत ती घरापर्यंत आणण्याचा क्षणही त्यानं शेअर केला. 



करिअरची एक वेगळी वाट निवडत त्या बळावर स्वप्न साकार करणारा हा विनायक सध्या सर्वांचीच मनं जिंकून जात आहे. तेही हक्काच्या मर्सिडीजमध्ये बसून.