मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेत्री करीना कपूरनंतर सोनम कपूरने कुटुंबाला आणि चाहत्यांना गुडन्यूड दिली. सोनमनंतर आता अभिनेत्री  विनी अरोरा लवकरच आई होणार आहे. 'कुंडली भाग्य' मालिकेमधून घराघरात आपला ठसा उमटवणारे धीरज धूपर आणि त्याची अभिनेत्री पत्नी विनी अरोरा लवकरच आई-वडील होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली. विनी अरोरा आणि धीरजची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



विनी आणि धीरजने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. फोटोंमध्ये दोघे प्रचंड आनंदी दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी गुडन्यूज सांगितल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


विनी आणि धीरज यांचं लग्न 16 नोव्हेंबर 2016 साली झालं. लग्नाच्या 5 वर्षांनंतर नव्या पाहुण्याचं करण्यासाठी दोघे सज्ज झाले आहेत. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.