`जोक करण्यासाठी पुरस्कार मिळतो?` एमी अवॉर्ड मिळालेल्या वीर दासची पोस्ट चर्चेत
Vir Das : वीर दासनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून त्याची चांगलीच चर्चा आहे. एमी अवॉर्ड मिळालेल्या वीर दासला विमानतळ अधिकाऱ्यानं केलेल्या प्रश्नाची एकच चर्चा
Vir Das : बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन वीर दासला नुकतंच एमी अवॉर्डनं सन्मानीत करण्यात आलं आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर वीर दाससोबत घरी परतत असताना विमानतळावर असं काही झालं की त्याला ही आश्चर्य झालं आहे. त्या मजेशीर गोष्टीला त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. त्यानं शेअर केलेल्या या घटनेवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
वीर दासनं त्याच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एमी अवॉर्ड घेऊन घरी परतत असताना त्याच्यासोबत विमानतळावर जे काही झालं त्याचा खुलासा त्यानं केला आहे. वीर दासला सोमवारी त्याच्या नेटफ्लिक्सवरील स्टॅंडअप स्पेशल 'वीर दास: लॅन्डिंग' साठी इंटरनॅशनल एमी अवॉर्ड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या सगळ्याविषयी सांगताना वीर दासनं पोस्ट शेअर केली आहे. बंगळुरु विमानतळावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यासोबत झालेला प्रसंग त्यानं शेअर केला आहे.
काय म्हणतोय वीर दास
बंगळुरु विमानतळ सुरक्षा
अधिकारी : बॅगमध्ये मुर्ती आहे?
मी : सर, अवॉर्ड आहे.
अधिकारी : अच्छा! याला शार्प पॉऊंट आहेत?
मी : सर, शार्प नाही! त्याचं पंख आहेत.
अधिकारी : अच्छा! दाखव.
मी बॅग उघडली. त्यांनी पुरस्कार पाहिला त्याला हातात घेऊन पाहिलं. हा शार्प नाही असं म्हटलं.
अधिकारी : चांगलं आहे. तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही काय करता?
मी : मी कॉमेडीयन आहे सर. विनोद ऐकवतो.
अधिकारी : विनोदासाठी पुरस्कार मिळतो?
मी : मला पण विचित्र वाटलं सर.
आम्ही दोघे हसू लागलो. मी पुरस्कार बॅगमध्ये ठेवला आणि माझ्या फ्लाईटकडे गेलो.
हेही वाचा : मृत्यूला जवळून पाहताना कतरिनाला पती विकीची नाही तर 'या' व्यक्तीची आली आठवण
वीर दासनं शेअर केलेली ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'आम्हाला तुझ्या आनंदात सहभागी करण्यासाठी थॅंक्यू. हे छोटे-छोटे अपडेट खूप चांगले आहेत. दुसरा नेटकरी म्हणाला, बेस्ट.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ही पोस्ट खूप चांगली आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ही विनोदी गोष्ट आहे की नाही की सगळ्यांना हसवण्यासाठी आणि आनंदी ठेवण्यासाठी मिळालेला पुरस्कार मिळणं आश्चर्यकारक आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तू सगळ्यांना हसवतोस, तपासणी होते तिथे देखील. वीर तुला शुभेच्छा.'