मुंबई : प्रचंड विरोध, तितकाच वाद आणि उत्सुकता यामुळे प्रदर्शापूर्वीच हिट ठरलेलेल्या संजय लिला भन्सालीचा 'पद्मावत' प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतोय. चित्रपटातील पात्रे आपल्या वैविध्यपूर्णतेमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, संगीत आणि नृत्य शौकिनांमध्ये या चित्रपटातील 'घुमर' गाण्याची क्रेझ काही औरच. ही क्रेज तरूणाईत किती आहे याचे दर्शन या व्हिडिओत एका तरूणीने स्केटींग शूज घालून केलेल्या नृत्यात दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयुरी भंडारी नावाच्या एका तरूणीने स्केटींग शूज घालून केलेला घुमर वरचे नृत्य सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. स्केटींग शूज घालून मयूरीने घेतलेली घुमरवरची गिरकी अनेकांच्या काळाजत घुसते. संजय लिला भन्सालीचा हा चित्रपट केवळ देशातच नव्हे तर, विदेशातही तितकाच गल्ला कमावताना दिसतोय. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा अधिकच जोरकसपणे होताना दिसते आहे.



दरम्यान, मयूरी भंडारीने केलेला घुमर गाण्यावरचे नृत्य 'घूमर डांस ऑन आइस-पद्मावत' नावाने युट्यूबवर व्हायरल होत आहे. तुम्हाला जर या गाण्याचा अविष्कार पहायचा असेल तर, हा व्हिडिओ जरूर पहा.