नवी दिल्ली : व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश वारीयर रातोरात देशभरात हिट झाली आहे. अनेक तरुणांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या प्रियाचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. तिचे व्हिडिओज इतके पटकन व्हायरल झाले की रातोरात ती प्रसिद्ध झाली. एका रात्रीत तिचे इंस्टाग्रामवर ६ लाखांहुन अधिक फॉलोव्हर्स झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तिचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तिचा सिंपल लूक पाहायला मिळतो.


 



बॉलिवूडच्या ऑफर्स नाकारल्या


प्रिया मल्यालम चित्रपट ओरू अदार लव यातून डेब्यू करत आहे. या चित्रपट शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे. तिला अनेक बॉलिवूड चित्रपटांच्याही ऑफर्स आल्या पण तिने कोणतीच ऑफर स्वीकारली नाही.


पोस्टमधून कमावते बक्कळ पैसा


तिच्या फॉलोव्हर्सची संख्या वाढल्याने तिच्या पोस्टमधून ती बक्कळ पैसे कमावते आहे. तिला नवनव्या ब्रॅंडच्या जाहिरातींसाठीही ऑफर्स येत आहेत.