या मराठी लघुचित्रपटाला यूट्यूबवर १० दिवसात २५ लाख हिट्स
तृतीय पंथांविषयी हादरवून टाकणारा हा लघुपट असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई : तृतीय पंथी लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या जीवनातील विविध समस्या, घटना, त्यांच्या भावना मांडणारा हा लघुपट आहे. तृतीय पंथांविषयी हादरवून टाकणारा हा लघुचित्रपट असल्याचं सांगण्यात येत आहे. विकास महाजन यांनी या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या लघुचित्रपटाला १० दिवसात २५ लाख लोकांनी पाहिलं आहे.
विशेष म्हणजे, या लघुचित्रपटासाठी काम करणारी सर्व मंडळी ही या क्षेत्रात नवीन आहे. कलाकार, छायाचित्रकार, दिग्दर्शकांपासून सर्वच कलाकार या ठक्षेत्रात नवीन आहेत. म्हणून नेटीझन्सने देखील त्यांचं सोशल मीडियावर कौतुक केलं आहे. हा लघुचित्रपट पुढील काही दिवसात १ कोटीचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. कल्याणच्या विकल्प अॅक्टींग पॉईंट आणि आविष्कार एज्युकेअर फाउंडेशनने या चित्रपटासाठी मदत केली आहे.