बॉलीवूड चे बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन (amitabh bachhan ) यांच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच असते , आजही त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते लाखो दूरहून येतात आणि त्यांच्या घराजवळ गर्दी करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकजण रोज त्यांना त्यांच्या घरासमोर पाहण्यासाठी तासनतास तासनतास घालवतात.  याच कारणामुळे अमिताभ दर रविवारी आपल्या चाहत्यांना भेटतात आणि त्यांच्याशी बोलतात.


त्यांची फक्त एक झलक पाहण्यासाठी त्यांचे हजारो चाहते बिग बींच्या घर ‘जलसा’ बाहेर गर्दी करत असतात.. पण यावेळी एक खास चाहता त्यांच्यासाठी थांबला होता .


हजारोंच्या गर्दीत बिग बींची नजर त्या चाहत्यावर पडली आणि त्यानंतर जे घडलं ते खूप कौतुक करण्यासारखं होत. खरतर इतर दिवसांप्रमाणे यावेळी बिग बी आपापल्या चाहत्यांना भेटण्यासाठी घराबाहेर आले


पण यावेळी त्यांची नजर पडली ती एक दिव्यांग चाहत्यावर आणि अमिताभ बच्चन यांनी त्याला बोलावलं त्यासोबत गप्पा मारल्या आणि इतकंच नाही  तर, जाताना त्याला काही भेटवस्तू  दिल्या .


बिग बी यांच्या या कृतीच सगळीकडे खूप कौतुक होतंय पण यामुळे तो चिमुकला चाहता मात्र कमालीचा खुश झाला हे नक्की