मुंबई : आमिर खान हा आपल्या हटके कामामुळे कायमच चर्चेत असतो. म्हणूनच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट असं म्हटलं जातं. कायम वेगळं काम करणाऱ्या आमिर खानने रक्षाबंधनच्या दिवशी देखील असंच काहीसं केलं. सोशल मीडियावर आमीर खानचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत त्याने आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेतली नाही पण त्याने एक वेगळं काम केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी आमिरने चक्क आपल्या बहिणींना राखी बांधली आहे. आमिरने रक्षाबंधनची जुनी परंपरा मोडीस काढली आहे. आणि बहिणींना राखी बांधून एक वेगळं उदाहरण जगासमोर ठेवलं आहे. आमीर खानने आपल्या दोन्ही बहिणींना राखी बांधली आहे. आणि त्याने हा संदेश दिला आहे की, आता स्त्री पुरूष समान आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी अनोखा संदेश दिला आहे. 



या फोटोची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्या कामातून वेगळ्या गोष्टी मांडणारा आमिर खऱ्या आयुष्यात देखील तसाच आहे. पानी फांऊडेशन मार्फत काम करून आमिर महाराष्ट्रातील अनेक गांवाना पाणीदार करत आहे. तसेच आता रक्षाबंधनच्या दिवशी बहिणींना राखी बांधून त्याने वेगळा संदेश दिला आहे.