मुंबई : सोशल मीडियाच्या वर्तुळात दर दिवशी अनेक गोष्टी व्हायरल होतात. त्यातच काही दिवसांपासून या अनेक गोष्टींची उपस्थिती असतानाही लक्ष मात्र एकाच व्हिडीओनं वेधलं होतं. ही गोष्ट, किंबहुना तो व्हिडीओ आहे 'बसपन का प्यार' या गाण्याचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बसपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे..' (Baspan Ka Pyaar) असं म्हणत एक लहान मुलगा गाणं गातो काय आणि त्याचा अनोखा अंदाज पाहून नेटकरी बेभान होतात काय. सारंकाही अविश्वसनीय. सहदेव कुमार दिर्दो या मुलानं हे गाणं गायलं आणि त्यावर असंख्य मीम्स बनले. पाहता पाहता सहदेव सोशल मीडिया सेंसेशन झाला. पण, तुम्हाला माहितीये का, सहदेव या गाण्याचा मुळ गायक नाही. किंबहुना हे गाणं काही आता प्रदर्शित झालेलं नाहीये. 


'बचपन का प्यार' हे गाणं गुजरातमधील एक आदिवासी लोकगाक कमलेश बरोट यांनी गायलं आहे. तीन वर्षांपूर्वी, म्हणजेच 2018 ला हे गाणं तयार करण्यात आलं होतं. मयूर नादियानं संगीतबद्ध केलेलं हे गाणं पिपी बरियानं लिहिलेलं. आतापर्यंत हे गाणं 48 लाखांहून अधिक जणांनी पाहिलं आहे. 



कमलेश बरोट यांच्या मते 2018 मध्ये साकारण्यात आलेल्या या व्हिडीओचे राईट्स अहमदाबादमधील कंपनी मेशवा फिल्म्सनं खरेदी केले आणि गाणं 2019 ला युट्यूबवर प्रदर्शित केलं. ज्यानंतर आता, सहदेव या लहान मुलाच्या शिक्षकांनी त्याचा हे गाणं गातानाचा व्हिडीओ शूट केला आणि पाहता पाहता हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला. 


छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना सध्या या गाण्यानं भुरळ झातली असून, रिअॅलिटी शोपर्यंतही त्याची लोकप्रियता पसरली आहे.