ऐश्वर्याने लेकीला वडील अभिषेकपासून दूर केलं? Viral Video वरून नेटकऱ्यांचा दावा
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबत ती एक प्राऊड आईदेखील आहे. अनेकदा ऐश्वर्या आणि आराध्या ऐकमेकींसोबत स्पॉट होत असतात. जिथे-जिथे ऐश्वर्या जाते तिथे-तिथे ती आपल्या लेकीला आराध्याला घेवून जाते.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबत ती एक प्राऊड आईदेखील आहे. अनेकदा ऐश्वर्या आणि आराध्या ऐकमेकींसोबत स्पॉट होत असतात. जिथे-जिथे ऐश्वर्या जाते तिथे-तिथे ती आपल्या लेकीला आराध्याला घेवून जाते. तर दुसरीकडे आराध्या तिची आई ऐश्वर्याचा हात पकडून चालताना कायम दिसते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन परिवारापासून वेगळी झाल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये सतत समोर येत आहेत. पण नुकतंच आराध्या annual day function मध्ये ऐश्वर्या राय मुलगी आराध्या आणि कुटुंबासोबत दिसली.
यावेळी केवळ ऐश्वर्या दिसली नाहीतर तिच्यासोबत अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चनदेखील दिसले. अनेकांचं असं म्हणणं आहे की, ही केवळ एक अफवा आहे. मात्र काही लोकांचं असंही म्हणणं आहे की, ऐश्वर्या भलेही आराध्यावर खूप प्रेम करत असेल मात्र ती आराध्याला तिचे वडिल अभिषेकपासून दूर ठेवते. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की, मुलगी आराध्या आणि ऐशला अभिषेकसोबत कोणतीच अॅटेचमेंट नसल्याचं दिसून आलं.
समोर आलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये हे दिसून येत आहे की, आराध्या शाहरुख खानचा मुलगा अबरामसोबत शालेय नाटकात परफॉर्म करताना दिसत आहे. या नाटकातील त्यांचा परफॉर्मन्स पाहून चाहत्यांनी आराध्याचं खूप कौतुक केलं आहे. याचबरोबर सुहानाने देखील आराध्याच्या या नाटकाचं खूप कौतुक केलं. हा कार्यक्रम संपल्यावर आराध्या तिची आई ऐश्वर्याच्या कारमध्ये बसते. यावेळी ऐश्वर्या आराध्याच्या डोक्यावर किस करते. मात्र अभिषेक कारच्या पुढच्या सीटवर बसतो. यावेळी तो खूप शांत दिसत आहे. हे पाहिल्यानंतर नेटिझन्सने यावर खूप प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेकांनी असंही विचारंल आहे की, अभिषेकपासून इतकं अंतर का? शेवटी ते आराध्याचे वडीलही आहेत.
समोर आलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स या व्हिडीओवर प्रचंड प्रतिक्रीया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहीलं आहे की, किती विचित्र आहे की, ती आराध्याला तिच्या वडिलांशी नीट भेटूही देत नाही. ऐश्वर्या आराध्या आणि तिच्या वडिलांना जवळ येऊ देत नाही. तर अजून एकाने म्हटलंय की, मला आराध्याने ऑस्कर जिंकल्यासारखं वाटत आहे, तर अजून एकाने म्हटलंय की, आम्ही आराध्याला तिच्या वडिलांशी बोलताना पाहिलंही नाही. अशा अनेक तीव्र प्रतिक्रीया युजर्स या व्हिडीओवर देत आहेत.