मुंबई : 'बाहुबली -१'च्या 'मनोहारी' गाण्यात आपल्या घायाळ करणाऱ्या अदांनी प्रेक्षकांसमोर आलेल्या बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह दिसते. अनेकदा ती आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते... आणि त्यामुळे ती अनेकदा चर्चेचा विषयही ठरते. नोरानं आपल्या इन्स्टाग्रामवर आता पुन्हा एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत ती एका व्यक्तीला मारहाण करताना दिसतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये नोरा लाल साडीत रस्त्यावरून जाताना दिसते... यावेळी रस्त्यावर उभा राहिलेला एक मजनू तिचा पाठलाग करू लागतो... आणि तिच्या घरापर्यंत पोहचतो. जसा तो नोराचा पाठलाग करू लागतो... नोरा त्याच्या तोंडावर मिरचीचा स्पे मारून त्याची चांगलीच धुलाई करते.



नोरासोबत या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव बाहिज कड्डोरा आहे. बाहिज कड्डोरा स्वत: व्हिडिओ ब्लॉगर आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत इन्स्टाग्रामवर ३.२५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय.