VIRAL VIDEO : केस ओढले अन्... लोकप्रिय गायकाच्या कॉन्सर्टमध्ये मुलींची फ्रीस्टाईल हाणामारी
Girls Fight Video : या मुलींचा भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Girls Fight Video : सेलिब्रिटी किंवा सिंगर आणि रॅपरचा कॉन्सर्ट असेल तर तिथे काहीना काही होतं. त्यामुळे तो कॉन्सर्ट हा बराच काळ चर्चेत असतो. अशीच काहीशी गोष्ट ही लोकप्रिय बॉलिवूड गायक अंकित तिवारीच्या कॉन्सर्टमध्ये घडला आहे. अंकित तिवारीचा बिहारच्या कटिहर येथे परफॉर्मन्स करत असताना तिथे दोन मुलींमध्ये महायुद्ध झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंच सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
अंकित तिवारी हा त्याच्या 'दिल चीज तुझे दे दी', 'तेरी गलियां', 'सुन रहा है' या गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात जागा केली. त्याचा बिहारमध्ये कॉन्सर्ट सुरु असताना तिथे दोन मुलींमध्ये हाणामारी झाली. या व्हिडीओमध्ये त्या दोन्ही मुली या एकमेकांचे केस ओढताना दिसत आहेत. व्हिडीओत कोणत्या गोष्टीवरून मुलींमध्ये हाणामारी झाली हे समोर आलेलं नाही. त्या मुलींना आवरणं इतकं कठीण झालं होतं की त्या मुलींना अनेक मुली सांभाळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'दिल चीज तुझे दे दी' हे गाणं अंकित तिवारी गाताना दिसत आहे. तर दुसरीकडे त्या गाण्यावर त्या मुलींची मारामारी सुरु आहे.
पाहा व्हिडीओ -
या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला की 'पापा की परियांनी अशा प्रकारे कटिहारचं नावं मोठं केलं आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'या आमच्या बिहारमध्ये.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'कटिहारच्या लोकांना लाइक करा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तिवारीका जलवा है.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'इतकं लक्ष जर अभ्यासात दिलं असतं तर अशा प्रकारे सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नसत्या.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'अशा प्रकारे यांनी आमच्या बिहारचं नाव खराब केलं आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'असं स्वागतं कधीच व्हायला नको...'
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल असून असे अनेक व्हिडीओ या आधीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये अनेकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच लक्ष वेधी असतात. तर पापा की परि म्हणत अनेक लोक कमेंट करत महिलांना ट्रोल करताना दिसतात.