मुंबई : बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास  (Nick Jonas) अनेक सोशल मीडियावर आपला व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना दिसतात. दोघं २०१८ मध्ये एकमेकांसोबत भारतीय पद्धतीनं विवाहबंधनात अडकले होते. आता दोघांचा एक रोमान्टिक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्याच महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये प्रियंका-निक यांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट केला होता. १ डिसेंबर २०१८ रोजी प्रियंका-निकचा भारतात विवाह झाला होता. या निमित्तानं चाहत्यांच्या या लाडक्या जोडीवर जगभरातून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला. 


'आज आणि नेहमीसाठी मी वचन देते. आनंद, उत्साह, संतुलन आणि उत्कटता अशा सगळ्याच गोष्टी तू मला एका क्षणात दिल्यास. मला शोधण्यासाठी धन्यवाद. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हसबंड... सगळ्यांनाच इतकं प्रेम आणि शुभेच्छा देण्यासाठी धन्यवाद' असं यावेळी प्रियंकानं म्हटलं होतं. 



कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, प्रियंका नुकतीच 'स्काय इज पिंक'मध्ये दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि झायरा वसीमही होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. तर निक नुकताच 'जुमानजी'मध्ये दिसला होता. त्याशिवाय तो सध्या आपल्या स्टेज परफॉर्मन्समध्ये व्यग्र आहे.