मुंबई : सारा अली खानसोबत रविवारी एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे कदाचीत तिचं करिअर देखील संपलं असतं. रविवारची सकाळ सारासाठी चांगली नव्हती. सकाळी सारा सीनसाठी तयार होत होती, या दरम्यान मेकअप करताना तिच्या व्हॅनिटीमधील बल्ब फुटला. ज्यामुळे सारा फार घबरली. ही घटना साराने रविवारी सकाळी तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीमध्ये सारा शूटसाठी तयार होताना दिसत आहे. येथे सारा आरशा समोर बसली आहे आणि मेकअप आर्टीस्ट तिचा मेकअप करत आहेत. तेवढ्यात एक मोठा आवाज ऐकायला येतो, ज्यामुळे सारा खूप घाबरते. खरंतर हा बल्ब साराच्या मेकअप मिररला लावलेला होता. जो साराच्या तोंडाच्या अगदी जवळ फुटला.


साराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या बल्बचा प्रकाशाचा फ्लॅश दिसत आहे तसेच त्याचा आवाज देखील ऐकू येत आहे. नशीबाने साराला काही दुखापत झाली. परंतु तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ हा बल्ब फुटल्यामुळे हे खरोखरच अभिनेत्रीसाठी धक्कादायक घटना होती.



साराने ही स्टोरी पोस्ट करताना लिहिले की, यासारखी सकाळ आणि पुढे इमोजी लिहिली आहे. साराने यास्टोरीमध्ये मेकअप आर्टिस्ट आदित्य शर्मा आणि पूजा विजन यांना देखील टॅग केले.


सारा सध्या विकी कौशलसोबत लक्ष्मण उतेकरच्या आगामी चित्रपटासाठी इंदूरमध्ये आहे. सारा काही आठवड्यांपासून इंदूरमध्ये शूटिंग करत आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन स्टारर लुका छुपीचा सीक्वल असल्याचे सांगण्यात आले आहे परंतु अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.