Gayatri Joshi Car Accident: अभिनेता शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) स्वदेश (Swades) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशीचा (Gayatri Joshi ) कार अपघात झाला आहे. अपघात झाला तेव्हा गायत्रीचा पती विकास ओबेरॉयही (Vikas Oberoi) कारमध्ये होता. इटलीमध्ये (Italy) झालेल्या या अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रस्ते अपघातात गायत्री आणि विकास दोघेही जखमी झाले आहेत. मात्र दुसऱ्या गाडीमध्ये असलेल्या एका स्विस जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री गायत्री जोशीच्या कार अपघाताचा लाइव्ह व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये मिनी ट्रक हवेत उडालेला दिसत आहे. मात्र, या भीषण अपघातात एका जोडप्याला आपला जीव गमवावा लागला आहे. गायत्री पती विकास ओबेरॉयसोबत लॅम्बोर्गिनी कारमधून प्रवास करत होती. हा भीषण अपघात इटलीच्या सार्डिनिया भागात घडल्याचे समोर आलं आहे. मात्र गायत्री जोशी आणि तिचा पती विवेक ओबेरॉय कार अपघातातून बचावले आहेत. हा भीषण अपघात झाला तेव्हा सुट्टीवर गेले होते. गायत्री आणि तिचा पती लॅम्बोर्गिनी चालवत असताना फेरारी आणि कॅम्पर व्हॅनला धडकली. फेरारी कारमधील जोडप्याचा मृत्यू झाला. लाल रंगाच्या फेरारी कारने अभिनेत्री गायत्री जोशीच्या निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यानंतर गायत्री जोशीची लॅम्बोर्गिनी कार पुढे जाणाऱ्या कॅम्पर व्हॅनला धडकली.


ही घटना घडली तेव्हा मागून येणाऱ्या कारमधून व्हिडिओ शूट करण्यात येत होता. या व्हिडिओमध्ये समोरून जाणाऱ्या मिनी ट्रकच्या मागे एकामागून एक आलिशान कार वेगाने जाताना दिसत होत्या. गायत्रीही तिच्या पतीसोबत लॅम्बोर्गिनीमध्ये जात होती आणि त्यांच्या मागे काही आलिशान गाड्या एकमेकांचा पाठलाग करत होत्या. मात्र अचानक ओव्हरटेक करताना, त्यांची लॅम्बोर्गिनी कार फेरारीला धडकते आणि पुढे असलेली कॅम्पर व्हॅन हवेत उडतो. यानंतर कॅम्पर व्हॅन उलटली आणि फेरारी कारलाही आग लागली, त्यामुळे त्या कारमध्ये बसलेल्या स्विस जोडप्याचा जागीच मृत्यू झाला.



दरम्यान, गायत्री आणि तिचा पती सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक वृत्तावाहिनीशी बोलताना गायत्री जोशी म्हणाली की, विकास आणि मी इटलीमध्ये आहोत, इथे आमचा अपघात झाला पण देवाच्या कृपेने आम्ही पूर्णपणे ठीक आहोत. गायत्री जोशीने 2004 मध्ये 'स्वदेस' या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली होती. मात्र, या चित्रपटानंतर तिने स्वत:ला अभिनयापासून दूर केले आणि ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले.