मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून एका बाप - लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेकांच्या व्हॅट्सअप स्टेटसवर हा व्हिडिओ देखील अपलोड झाला तर अनेकांनी आपल्या फेसबुकवर या व्हिडिओ शेअर केल आहे. या बाप - लेकीचा व्हिडिओ कितीही पाहिला तरी मन भरणार नाही असा हा व्हिडिओ. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला. अगदी शेअर देखील केला. पण ही बाप - लेकीची जोडी नेमकी कोण आहे माहित आहे का? या व्हिडिओ मागचं कारण काय? सोशल मीडियावर हे दोघे हा व्हायरल झाले हे आपण पाहूया 



या गोंडस मुलीचं नाव आहे ‘मायला’. ती २ वर्षांची आहे. ती आणि तिचे बाबा ज्या गाण्यावर ‘लीप सिंक’ करत आहेत त्या गाण्याचं नाव आहे ‘Girls Like You’. हा व्हिडीओ मायलाच्या आईने तयार केला असून पहिल्यांदा युट्युबवर अपलोड केला होता. त्यानंतर तो सगळीकडे पसरला. या व्हिडीओने इतकी कमाल केली की ‘Girls Like You’ या गाण्याच्या व्हिडीओचे युट्युबवरचे व्ह्यूज रातोरात वाढले.



व्हायरल होणाऱ्या गाण्याचा हा खरा व्हिडिओ आहे. बाप - लेकीच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर या व्हिडिओला देखील अधिक पसंती मिळाली आहे.