मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सोमवारी विवाह बंधनात अडकले. ट्विटरवर फोटो शेअर करून अनुष्का आणि विराटनं लग्नाची घोषणा केली. विराट आणि अनुष्काच्या लग्नाचे सगळे कपडे सब्यसांची मुखर्जीनं डिझाईन केले होते.


अनुष्काच्या लेहंग्यावर नाजूक डिझाईन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नामध्ये अनुष्कानं घातलेला लेहंगा ६७ कारागिरांनी ३२ दिवस मेहनत करून बनवला होता. अनुष्का-विराटच्या लग्नासाठी फुलांची थिम बनवण्यात आली होती. त्यामुळे कपडे डिझाईन करतानाही या थीमचा विचार करण्यात आला होता. म्हणून अनुष्काच्या लेहंग्याचा रंग पर्ल पिंक होता. अनुष्काच्या लेंग्यावर चिमण्या आणि फुलपाखरांचं नाजूक काम करण्यात आलं होतं.



सब्यसांचीचं हेरिटेज ज्वेलरी कलेक्शन


लेहंग्याबरोबरच अनुष्कानं सब्यसांचीच्या हेरिटेज कलेक्शन ज्वेलरी परिधान केली होती. ही ज्वेलरी सिंडिकेट अनकट डायमंड, पिंक पर्ल आणि बरोक जपानी संस्कृतीच्या मोत्यांनी डिझाईन करण्यात आलं होतं. तर विराट कोहलीनं सब्यसांचीनं डिझाईन केलेली एंब्रॉयडरी शेरवानी घातली होती.



इकडे होणार रिसेप्शन


विराट आणि अनुष्काचं २१ डिसेंबरला दिल्लीमध्ये तर २६ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन होणार आहे. मुंबईतल्या रिसेप्शनला बॉलीवूड कलाकार आणि क्रिकेटपटूंबरोबरच अन्य सेलिब्रिटींची उपस्थिती असेल. यानंतर अनुष्का शर्मा विराट कोहलीबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अनुष्का परत भारतात येईल आणि शाहरुखसोबत नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. विराट आणि अनुष्का मुंबईतल्या वरळीच्या घरात राहणार आहेत. विराटनं मागच्याच वर्षी हे घर घेतलं होतं.