मुंबई : बी टाऊनमध्ये गेल्या वर्षापासून लग्नाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आणि हा उत्साह अगदी आता ईशा अंबानीच्या लग्नापर्यंत कायमच आहे. याची सुरूवात झाली ती म्हणजे 'विरूष्का'च्या लग्नापासून. विराट-अनुष्का यांच्या लग्नाला आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटली शहरातील फ्लोरेंसच्या बोर्गो फिनोशिटो रिसॉर्टमध्ये या दोघांनी 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न केलं. अतिशय खाजगी पद्धतीने हा सोहळा पार पडला. पण या लग्नाची जादू आजही चाहत्यांच्या मनावर आहे. 


आज या दोघांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. अनुष्काने आपल्या लग्नाचे खास क्षण व्हिडिओच्या रुपात सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओतून आपल्याला त्या दोघांच प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित होतो. 



The Wedding Filmer ने विरूष्काच्या लग्नाचे खास क्षण टिपले होते. या व्हिडिओ पाहून तुम्हाला अंदाज येईल की, हे दोघे लग्नाच्या आनंदात किती आकंठ बुडाले होते. क्रिकेट-बॉलीवूड ही जोडी काही नवी नाही. पण विरूष्का प्रत्येकाची खास जोडी आहे. 


जेव्हा तुम्ही उत्तम आणि योग्य माणसाशी लग्न करता तर तेच तुमच्यासाठी स्वर्गसुख असते अशी भावना अनुष्काने आपल्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी भावना शेअर केली आहे. आणि आपल्याला माहितच आहे की, ही जोडी प्रेक्षकांसाठी देखील खूप खास आहे. 



अनुष्काप्रमाणेच विराटने देखील आपल्या भावना शेअर केल्या. विराट म्हणतो की, विश्वास बसत नाही आपल्या नात्याला वर्ष झालं. असं वाटतं कालच आपलं लग्न झालं आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत #MineForever म्हणतं भावना व्यक्त केल्या.


तसेच विराटने या भावनेसोबत अनेक खास क्षणचित्रे फोटो शेअर केल्या आहेत. आपल्याला माहितच आहे विराटचं हे इटलीतील लग्न खूप खास राहिलं आहे. या लग्नानंतर इटलीतील बी टाऊनमधील अनेक लग्न पार पडले.