आजच्या रिसेप्शनला Virushka दिसणार वेस्टर्न स्टाइलमध्ये
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली इटलीमध्ये या महिन्यात विवाह बंधनात अडकले.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली इटलीमध्ये या महिन्यात विवाह बंधनात अडकले.
त्यानंतर दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर झाले. शेअर झालेल्या सगळ्या फोटोंमध्ये दोघेही अगदी इंडियन लूकमध्ये पाहायला मिळाले. इटलीतील विवाह सोहळ्यात आणि दिल्लीतील रिसेप्शनमध्ये दोघे ही सब्यसाचीने डिधाइन केलेल्या अगदी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसले.
आज या दोघांनी मुंबईत बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर्ससाठी रिसेप्शन ठेवले आहे. आता या रिसेप्शनमध्ये दोघे वेस्टर्न लूकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. सब्यसाची ही भारतातील लोकप्रिय डिझाइनर आहे. तिने डिझाइन केलेलाच काही वेस्टर्न लूक हे दोघे फॉलो करणार की इंडियन लूकमध्ये दिसणार हे पाहणं खरंच उत्सुकतेचं आहे.
21 डिसेंबरला दिल्लीत कौटुंबिक रिसेप्शन झाल्यानंतर आज हे दोघे मुंबईत रिसेप्शनसाठी असणार आहेत. दोघांनी दोन वेगवेगळे रिसेप्शन प्लान केलेत. आतापर्यंत त्यांनी सगळ्या सोहळ्यात सब्यसाचीने डिझाइन केलेले घातले. पण आता बॉलिवूडमधील लोकप्रिय डिझाइनरर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे परिधान करते का? अशी देखील चर्चा आहे की रितू कुमारच्या कपड्यांमध्ये दिसणार का विरूष्का?