Vishakha Subhedar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदारचे लाखो चाहते आहेत. विशाखा फु बाई फु’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' अशा अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली. विशाखाला खरी ओळख ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून मिळाली. विशाखा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यात तिच्या पतीसोबतच्या अनेक पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहतो. तिच्या लव्ह स्टोरी विषयी जाणून घेण्याची अनेकांना इच्छा होती. त्यात नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विशाखानं तिच्या लव्ह स्टोरीविषयी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाआधी नवऱ्याला दादा म्हणायचे सांगत विशाखा तिची लव्ह स्टोरी सांगितली आहे. विशाखा म्हणाली की 'लग्नाआधी मी माझ्या नवऱ्याला दादा म्हणायचे. काकस्पर्श या नाटकामुळे आमची भेट झाली. या नाटकाचा तो असिस्टंट दिग्दर्शक होता. तेव्हा मी लहान होते. त्यानं मला एक दिवस तू मला दादा म्हणू नको असं सांगितलं. काळजी करणारा, प्रेम करणारा माणूस बायकांना हवा असतो. तेव्हा आर्थिक गणितं डोक्यात नसतात. त्याचं काळजी करणं, प्रेम करणं आवडायला लागलं आणि मी हो म्हणाले.'



पुढे लग्नाला घरच्यांचा विरोध होता हे सांगत विशाखा म्हणाली की 'आमच्या लग्नाला आई-वडिलांकडून विरोध होता. माझ्या वडिलांना मी नाटकात काम केलेलंच आवडत नव्हतो. तर नाटकात काम करणाऱ्या माणसाशी लग्न करणं, त्यांना कसं आवडेल? माझ्या आजीनं मग आई-वडिलांना सांगितलं. तिच्या क्षेत्रात काम करणारा माणूस तिला भेटला आहे, तर तुम्ही कशाला अडवताय? आजीमुळे माझ्या वडिलांनी लग्नाला होकार दिला. पण लग्नाआधी त्यांनी आमच्यासमोर एक अट ठेवली आणि ती म्हणजे आमची मुलगी टीव्हीत दिसली पाहिजे. वडिलांची ही अट माझ्या नवऱ्यानेही मान्य केली. आमची लव्हस्टोरी पण कमाल होती. घरी कळल्यावर 15 दिवस आई बोलत नव्हती. कोंडून ठेवलेलं...फूल एक दुजे के लिए...'



सविस्तर वाचा : प्राजक्ता माळी लग्न करणार नाही? लग्नाबद्दल अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा


या मुलाखतीत विशाखानं तिच्या खासगी आयुष्यासोबतच कामाविषयी देखील वक्तव्य केलं. विशाखानं यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडण्याचं कारण देखील सांगितलं. विशाखाच्या कामा विषयी बोलायचे झाले तर तिनं ‘कुर्रर्र’ या नाटकातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. सध्या विशाखा ही ‘शुभविवाह’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.