मुंबई : सिनेमांचा डायलॉग व्हायरल व्हायला काही वेळ लागत नाही. आणि त्यात मराठीमधील 'नटसम्राट' या सिनेमातील डायलॉग सर्वांच्याच आवडीचे आहेत. पण याच सिनेमातील डायलॉग जर कुणा शेफच्या तोंडी असेल तर... आश्चर्यचकित झालात ना... कारण शेफ म्हटलं की उत्तम चवीचं खायला मिळणार हे नक्की पण शेफकडून उत्तम डायलॉग ही गोष्ट जरा वेगळी आहे ना. 


 'बघावं की खावं हा एकच सवाल आहे' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पण काही दिवसांपूर्वी शेफ विष्णू मनोहर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शेफ एक डायलॉग बोलत आहेत. हा डायलॉग कुणा सिनेमातील नसून त्यांनी तयार केला आहे. पण या डायलॉगसाठी त्यांनी 'नटसम्राट' या सिनेमातील डायलॉगचा आधार घेतला आहे. सिनेमातील 'जगावं की मरावं हा एकच सवाल आहे' या डायलॉगच्या आधारे 'डाएट' करणाऱ्यांसाठी एक खास डायलॉग लिहिला आहे. याची सुरूवात 'बघावं की खावं हा एकच सवाल आहे' या सिनेमांत त्यांनी डायटिंग करणाऱ्यांची व्यथा मिश्किलपणे सांगितलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. 


विष्णू मनोहरांनी रचला विक्रम 


शेफ विष्णू मनोहर यांनी सलग ५६ तास स्वयंपाक करत 'विश्वविक्रम' रचला. ५६ तासांत मनोहर यांनी एक हजारांहून अधिक चविष्ट पदार्थ बनवल्याची माहिती आयोजकांनी दिली. विष्णू मनोहर यांनी अमेरिकेतील ग्रीन व्हिलेजचे बेंजामिन पेरी यांचा सलग ४० तास स्वयंपाक करण्याचा विक्रमही मोडला असून आता मनोहर यांचे नाव ' गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंदवण्यात येईल. प्रसिद्ध उद्योजक विठ्ठल कामत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


मैत्री परिवारच्यावतीने 'मॅरेथॉन कूकिंग’चा हा आगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्समध्ये खास तयार करण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशा स्वयंपाकघरात शुक्रवारी सकाळी या उपक्रमाला सुरूवात झाली. महाप्रसादाकरिता लागणारा शिरा तयार करून मनोहर यांनी त्यांच्या पदार्थ तयार करण्याच्या जागतिक विक्रमाची सुरुवात केली. त्यापाठोपाठ नैवेद्यासाठी लागणारे मोदक तयार केले.